आंदोलकांना मंत्रालयात भेटण्याचा दिल आश्वासन
कंपनी बंद होण्यापर्यंत आंदोलन आंदोलनावर ठाम
प्रतिनिधी बाळू सनगरे
खेड – तालुक्यातील लोठे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पिफास च उत्पादन होत असल्यामुळे ही कंपनी बंद व्हावी याकरता गेले १२९ दिवस कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आजपर्यंत जबाबदार प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज लोटे एमआयडीसी मध्ये खाजगी दौऱ्यानिमित्त राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या लोट या ठिकाणी आले असता त्यांची भेट घेतली.
आंदोलन करताना आपलं म्हणणं मांडलं त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ताबडतोब मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे संपर्क करून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले व काही दिवसातच आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक ही मंत्रालयात बोलावली जाईल अशा प्रकारचे आश्वासन आंदोलन करताना दिले आहेत