RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

अनिकेत पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थांना मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांचे स्वीय सहायक श्री. अनिकेत पटवर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष सेवाभावी संस्था रत्नागिरी यांच्यावतीने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या सौजन्याने आयोजित शालेय विद्यार्थांना मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम गोंदूताई जांबेकर विद्यालय रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाची सुरुवात केली आणि उपस्थित विद्यार्थांना आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयव पैकी डोळे किती महत्वाचे आहेत डोळ्यांचे महत्त्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांनी कायम आपल्या आई-वडिलांचा गुरुजनांचा आदर आणि मान सन्मान केला पाहिजे, चांगल्या व शिस्तबद्ध शिक्षणाने आपली प्रगती साधता येते, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर टाळला पाहिजे असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि संस्था चालकांना आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शुभेछ्या दिल्या.
उत्कर्ष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुहास (राजू) भाटलेकर यांनी अत्यंत समाजपयोगी चांगला उपक्रम राबवीत असून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविणार असून सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करणार आहे असे सांगितले. अशा चांगल्या उपक्रमाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार मानले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews