RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

पावसाळ्यापूर्वी गटार-नाले सफाईसाठी नगरसेविका वर्षा ढेकणे यांची पुढाकाराने मोहीम

रत्नागिरी – पावसाळा तोंडावर आलेला असताना नागरिकांना पाणी साचणे गटारे तुंबणे व दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांनी पुढाकार घेत प्रभागातील गटार व नाल्यांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे.

नगरसेविका वर्षा ढेकणे या स्वतः जातीनिशी उपस्थित राहून विविध भागांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने गटारे व नाले साफ करून घेत आहेत अनेक ठिकाणी गाळ कचरा व झाडाझुडपांमुळे नाल्यांचा प्रवाह अडथळलेला होता तो तातडीने हटवून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहेत असे वर्षा ढेकणे यांनी सांगितले.
प्रभागातील नागरिकांनी देखील नगरसेविका वर्षा ढेकणे यांच्या या तत्परतेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या साफसफाई मोहिमेमुळे संभाव्य पूरस्थिती व पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews