चिपळूण – एचडीएफसी चिपळूण शाखेत कार्यरत 33 वर्षीय युवक काल दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मुकुंद मुरलीधर पालांडे असे त्यांचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत.बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे हाताने चिपळूण पोलिस निरीक्षक यांना चार पानी पत्र लिहिले असून एच डी एफ सी चिपळूण शाखेतील चार जणांची आपल्या आत्महत्येस जबाबदार म्हणून नावे नोंदवली आहेत.दोन दिवसापूर्वी चिपळूण विरेश्वर तलाव येथे त्याला काही तरुणांनी मारहाण केली होती.ओळखीच्या पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा उल्लेख त्या पत्रात केला आहे.आपणास मानसिक त्रास आणि ब्लॅकमेल केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने म्हटले आहे.शिरगाव पोलिस निरीक्षक भरत पाटील यांनी काल रात्री साडे आठ पर्यंत कोळकेवाडी येथील कॅनॉल नजीकच्या त्याची दुचाकी आढळली त्याभागात शोध घेतला.आज सकाळी चिपळूणहून बोट आणून शोधमोहीम सुरू आहे. या तरुणाचे कुटुंबीय काळजीत आहे व त्यांची ही मानसिक स्थिती दबावाखाली आहे.