RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

कोंड्येत घरावर वीज पडल्याने युवतीसह महिला जखमी.

राजापूर तालुक्यातील हातिवले आरेकरवाडी येथे वीज पडल्यान चीरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाल्याची घटना ताजी असताना रविवारी कोंडये तर्फ सौंदळ येथे घरावर वीज पडल्याने युवतीसह महिला जखमी झाली आहे.तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जारदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातिवले आरेकरवाडी परिसरात वीज पडल्याने चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये कोंड्यये तर्फ सौंदळ, बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याने घरात असलेल्या रविना लहू बेंद्रे (१७), व सारिका रघुनाथ बेंद्रे (४५) या जखमी झाल्या आहेत. या दोघीनाही उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. वीज पडल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews