रत्नागिरी :-* चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाचा एबी फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर देत उमेदवारी जाहीर केली.महायुतीत ज्या पक्षाचे विद्यमान आमदार त्या जागा त्याच पक्षाला सोडण्यात येणार हेच सुत्र अनेक ठिकाणी असल्याने चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे नक्की असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर करण्याआधीच मुंबई येथे झालेल्या बैठकीत काही उमेदवारांना एबी फॉर्म बहाल करण्यात आले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार शेखर निकम यांची घोषणा करण्यात आली. निकम यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.