RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

आमचा हायवेच पुरा ब्लॅक स्पॉट आहे; आमदार शेखर

आम. शेखर निकम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत विधानसभेत मांडली व्यथा

मुंबई

  • पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत लोकांची अस्वस्थता, जीवितधोके आणि वाहतुकीतील अडथळे यावर अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. आदरणीय मंत्री महोदय, आपण जबाबदारी घेतल्यापासून स्वतः गाडीतून फिरून ब्लॅक स्पॉट पाहिलेत. पण आमचा संपूर्ण मार्गच एक ब्लॅक स्पॉट आहे,असे स्पष्ट शब्दांत सांगत बुद्धवाडीसारख्या ठिकाणी अंडरपास अभावी निर्माण झालेल्या आंदोलनांचीही माहिती दिली.

त्यांनी विनंती केली की, माननीय गडकरी साहेबांसोबत बैठक घेऊन चिपळूणसह सातारा-रत्नागिरी परिसरातील सर्व समस्या एकत्रितपणे सोडवाव्यात. यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवत सांगितले की, आमदार शेखर निकम यांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. या मुद्द्यावर सर्व आमदारांसोबत एकत्र बैठक घेतली जाईल व त्याचे पत्रक गडकरी साहेबांनाही दिले जाईल. संपूर्ण नॅशनल हायवे प्रकल्पासाठी संबंधित लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पुढची दिशा ठरवू.

https://chat.whatsapp.com/EwUJdbR6AzMIbtH0dvqgTt

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews