RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्याकडून स्मिता लेले यांचा सन्मान

रत्नागिरी – ग्रामपंचायतीत सरपंचपदी सौ. स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी स्मिता लेले यांच्या घरी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्मिता लेले या पूर्वी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव, सामाजिक जाणीव आणि प्रामाणिक कार्यपद्धती लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सरपंचपदाची जबाबदारी दिली आहे.

निवडीनंतर बोलताना स्मिता लेले यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews