कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड
चिपळूण : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्य कार्यध्यक्षपदी रामहरी राऊत यांची निवड करण्यात आली.तर कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यध्यक्ष रामहरी राऊत यांनी आपल्या स्वाक्षरीने राज्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. विभागीय सचिव पदी उत्तर महाराष्ट्र सचिवपदी जितेंद्र
गवळी, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी गौरव गुळवणी, पूर्व विदर्भ विभागीय सचिव पदी चंद्रशेखर चड्डे, गजानन ठाकूर , कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे त्याचप्रमाणे विभागीय संपर्क प्रमुखपदी अमित वरणकर (पश्चिम विदर्भ विभाग)
सुरज जम्मा (पश्चिम महाराष्ट्र), गजानन गिरी (मराठवाडा विभाग), प्रशांत साळुंके (पश्चिम महाराष्ट्र विभाग), राज गुहागरकर (मुबंई विभाग), हनुमंत पाटील (मराठवाडा विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य खालील प्रमाणे गणपत कांबळे, रणजित परदेशी, अमोल पाटील, निखील बुडजडे, योगेश म्हस्के, सौ. सिमा कल्याणकर, सौ. सोनालीताई देशमुख, चिराग आनंद, धनजंय पवार, भूषण सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.