राज्यात गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता, त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही या जागेवर दावा केला होता.मात्र, काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे, बुधवारी भाजपा नेते गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड 1 तास चर्चा झाली. त्यानंतर, नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. अखेर विद्यमान खासदार शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.