संगमेश्वर तालुक्यातील कर्ली येथे रविवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. दोन प्राण्यांच्या झटापटीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.कर्ली येथील सुधीर चाळके यांच्या राहत्या घराजवळ सकाळी ८.३० च्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. पोलीस पाटील सुयोग जाधव यांनी याची खबर वनविभागाला दिली. यानुसार वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदर ठिकाणची पाहणी केली असता दोन प्राण्यांच्या झटापटीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. परिसरामध्य ठिकठिकाणी रक्त सांडल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या डाव्या पायाच्या वरील बाजूस गळ्याच्या खाली ठिकठिकाणी चावा घेतल्याचे व झटापटीच्या खुणा दिसून आल्या.