चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण पोलिसांनी धाड टाकून एका तरुणाकडून 59 हजार किंमतीचा 990 ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रोहिदास बाळू पवार (28, पिंपळी खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.