चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उभाटा तसेच काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत यादव यांनी आपल्या हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. त्रिकोणातील जवळपास सर्वच मंदिराच्या दर्शनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीने जात प्रशांत यादव यांनी आपल्या समर्थकांसह कुटुंबीयांसह हा अर्ज दाखल केला यावेळी माजी आमदार रमेश कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने राजू महाडिक सचिन कदम तसेच अनेक आघाडीचे नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आजची गर्दी बरेच काही सांगून जात आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि मला संगमेश्वर- चिपळूण मतदारसंघातून उमेदवारी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी देखील खंबीर साथ दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले या सर्वांनी मला आघाडीचा उमेदवार म्हणून स्वीकारले. त्यामुळेच मी आज आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आजची गर्दी ही महाविकास आघाडीवरचा विश्वास माझ्यावर असलेल्या प्रेमाची साक्ष आहे. जनतेचे हे प्रेम माझ्या विजयाची खात्री देत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रशांत यादव यांनी यावेळी दिली.