खेर्डी – एजिस हेल्थकेअर ( पूर्वीचे स्पंदन क्लिनिक) द्वारे मल्टीस्पेशालिटी आणि इंडस्ट्रियल ट्रॉमा केअर या आरोग्य सेवेचा शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला. या सुविधे अंतर्गत अपरांत हॉस्पिटल द्वारे सर्जरी, मेडिसिन व ऑर्थोपेडिक, माधवबाग क्लिनिक चिपळूण, स्प्रिंग क्लिनिक, डेंटल क्लिनिक, डायटीशियन या वैद्यकीय सेवांसोबतच इन्स्टा केअर लॅब, डिजिटल एक्स-रे, इसीजी व 24 तास ॲम्बुलन्स या सुविधा नागरिकांसाठी देण्यात येणार आहेत.
खेर्डी – खेर्डी व परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी ट्रॉमा केअर आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या हेल्थकेअर मल्टी स्पेशलिटी क्लिनिकमध्ये सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये अपरांत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉक्टर हर्षद होन, डॉक्टर सद्गुरु पाटणकर, ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ.श्रीश भास्करवार, यांचे द्वारे रुग्ण तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कोणत्याही आपत्कालीन रुग्णांसाठी 24 तास तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. माधवबाग क्लिनिक चिपळूणच्या क्लिनिक हेड डॉ.राधा मोरे यांचे द्वारे डायबिटीस हृदय रोगांच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार उपलब्ध होणार आहेत. दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी डॉ.पूर्वा भास्करवार ( MDS) यांचे द्वारे डेंटल क्लिनिक चालविले जाणार आहे. स्प्रिंग क्लीनिक चि चिपळूण द्वारे त्वचा आणि विकार असणाऱ्या रुग्णांसाठी तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सर्व सेवांसोबतच डायटीशन आणि 24 तास ॲम्बुलन्स सेवा पुरविण्यात येणार आहे.
विविध आजारांच्या रुग्णांसाठी तपासणी व सेवा, तज्ञ डॉक्टर्स यामुळे एजिस हेल्थकेअर हा लोकाभिमुख व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. या उपक्रमाद्वारे घरबसल्या पॅथॉलॉजी टेस्ट करण्यात येणार आहे. या सर्व सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन टीम एजिस व प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.