चिपळूण – महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत हे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येत असून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दौऱ्याचे प्रारंभ होणार आहे.
चिपळूण शहरात सकाळी साडेनऊ वाजता प्रचार फेरी सुरू होऊन त्यानंतर सकाळी दहा वाजता पेढांबे येथील पुष्कर हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अलोरे व पोफळी जिल्हा परिषद गट व नांदीवसे पंचायत समिती गण येथील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर दुपारी बारा वाजता पेढे या गावात बैठक आयोजित करण्यात आले असून पेढे व कोंढे येथील पंचायत समिती गणातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर दुपारी तीन वाजतासावर्डे येथे बैठक होणार असून यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
तरी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विनोद झगडे ,मुराद अडरेकर व लियाकत शहा यांनी केले आहे