कोकणातील वालावालकर हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बिणीद्वारे एका लहान मुलीवर मेंदूतील ट्यूमर काढण्यात यश
सावर्डे – १२ वर्षीय मृण्मयी ही १५ दिवस उलट्या होणे, भूक ना लागणे, डोके दुखी असा त्रास होत होता आणि त्यामुळे डॉक्टराना कडून सलाईन लावणे या मुळे तिचे वजन १० किलो ने घटले आणि अगदी हताश होऊन कृश अवस्थेत तिला शेवटचा पर्याय म्हणून वालावलकर रुग्णालयात आणले. न्यूरोसुर्जन मृदुल भटजीवाले नी तपासून मेंदूचा एम. आर. आय केला आणि त्यात मेंदूच्या पाण्याच्या नलिकांमध्ये एक गाठ होती ज्याला एपिण्डिमोमा असे म्हणतात. तीला सूज येऊन ती मेंदूवर दाब देत असल्याने उलट्या होत होत्या आणि आता मृण्मयी अगदी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत जाणार त्या अगोदरच तिच्यावर अत्यतं क्लिष्ट पण योग्य शस्त्रक्रिया केली गेली
शस्त्रक्रियेनंतर मृण्मयी झपाट्याने सुधारू लागली उलट्या थांबल्या चालू फिरू लागली आणि आता तर ती पुन्हा शाळेत जाण्याचा विचार ही करत आहे.
ही जटिल मेंदूची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत बीकेएल वालावालकर हॉस्पिटलमध्ये विनामूल्य करण्यात आली, डॉ. भटजीवाले आणि सहकारी डॉ. श्रेया टिबडेवाल, डॉ. सुधांशू सतीश राणे शस्त्रचिकित्सक आणि भूलतज्ञ साठी डॉ. लीना ठाकूर, आणि त्यांची टीम डॉ. अस्मिता, डॉ. सलोनी ह्यांनी जबाबदारी उचलली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोकणातील रुग्णांना आता मेंदूतील ट्यूमरच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यात जाण्याची गरज नाही. ही शस्त्रक्रिया जीव वाचविणारी होती आणि ती यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे मृण्मयीचे जीवन वाचविण्यात आले. कोकणातील पहिली मायक्रोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.