दापोली .:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि पतंजली योग समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने योग गुरु विश्वास फाटक व योगशिक्षक पराग केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालगाव ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पत्रकार व पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा दांडेकर, मुख्य योग शिक्षक शैलेश आठले,योगशिक्षिका हर्षदा ताई डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरामध्ये योग ध्यान सात्विक जीवनशैली आहाराशास्त्र ॲक्युप्रेशर पॉइंट आणि मेडिटेशन तसेच विविध व्याधींवर करावयाचे योग प्रकार याविषयी बहुमोल मार्गदर्शन मिळणार
हे योग शिबीर पूर्णतः मोफत असून सकाळी सहा ते सात या वेळेत आठ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे .या शिबिरामध्ये योग ध्यान सात्विक जीवनशैली आहाराशास्त्र ॲक्युप्रेशर पॉइंट आणि मेडिटेशन तसेच विविध व्याधींवर करावयाचे योग प्रकार याविषयी बहुमोल मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती मुख्य योग्य शिक्षक शैलेश आठले यांनी यावेळी दिली.
शिबिर यशस्वी करण्याकरिता योगशिक्षक नम्रता राजेशिर्के,योगशिक्षक समृद्धी बुरटे, कुमार निरंजन शिगवण ज्येष्ठ गुरुबंधू नंदकुमार शिगवण यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या तर्फे करण्यात आले आहे.