शासनाने कोरोनामुळे घातलेल्या लॉकडाऊमध्ये सध्या काही अटींना शिथिलता देवून बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध भागात बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. संगमेश्वर येथील बाजारपेठ सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. दुकानात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनी सुरक्षित अंतर व सॅनिटायझर वापरण्याचे नियम शासनाने घालून दिला आहे. मात्र संगमेश्वर बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर होणार्या गर्दीत सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुकानासमोर ग्राहक दाटीवाटीने उभे राहत आहेत. प्रशासनाने मास्क न वापरल्यास दंडाचीही तरतूद केली आहे. मात्र असे असूनही येणारे काही ग्राहक मास्क न वापरताच खरेदीसाठी येत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.