टॉवर बंद स्थितीत, संपर्क होईना, माजी सैनिकांमधून संताप
खेड – तालुक्यातील पंधराव विभाग गेल्या काही वर्षापासून विकासापासून दुर्लक्षित असाच राहिलेला आहे. या परिसरात भौतिक सुविधांची वानवा राहिली आहे. काही वर्षांपूर्वी येथे ठिकाणी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र हा टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकारी, तसेच केंद्रीय स्तरापर्यंत पत्रव्यवहार केला, तरिही बीएसएनएलची सेवा सुरू झालेली नाही. परिणामी या परिसरातील माजी सैनिक, तसेच ग्रामस्थ आणि तरूणांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सह्याद्रीच्या टोकास वसलेला खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग. या परिसरातील गावे खेडपासून दूरवर असली, तरी या परिसरातील ग्रामस्थांची नाळ चिपळूणशी जोडलेली आहे. शासकीय कामे वगळता व्यवसाय, नोकरी व बाजारपेठेत खरेदीसाठी येथील ग्रामस्थांना चिपळूणात धाव घ्यावी लागते. खेड तालुक्यातील आंबडसपर्यंत बीएसएनएलची चांगली सेवा मिळते. मात्र पंधरागाव, काडवली, कुंभवली, मुसाड, वावे, चोरवणे, पोसरे आदी परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील बीएसएनएलचा टॉवर बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरातील सर्वच गावात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे, तर सध्या भारतीत सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांची संख्याही येथे जास्त पाहायला मिळते. नोकरी, व्यवसाय निमित्ताने परगावी असलेल्या मुलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता येतो. मात्र ही
मुसाड गावात बीएसएनएल नेटवर्क जवळपास बंद
पंधरा-वीस दिवसांपासून बंद आहे. महिन्यातून पाच-सहा दिवस टॉवर बंद असतो. शेजारी असेलल्या धामणंद येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावरती बीएसएनएलचा टॉवर आहे. परंतु तो अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये असतो. वारंवार पाठपुरावा बीएसएनएल प्रशासन लक्ष देत नाही. लाईट गेल्यानंतर तिथे पर्यायी डिझेल, जनरेटर बॅटरी बॅकअप नाहीये. त्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे, परंतु लक्ष देत नाहीत. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही येथे दूरध्वनी सेवेची विदारक स्थिती आहे, याचेच दुर्दैव वाटते.
- बाळकृष्ण श्रीरंग सुर्वे, माजी सैनिक
सेवाच कोलमडल्याने संपर्काची साधनेच बंद झाली आहेत. टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नाही. महिन्यातून आठवडाभर, तर ही यंत्रणा बंद राहाते. याबाबत ग्रामस्थांनी बीएसएनएस च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर लवकरच सेवा सुरू होईल, असे सांगण्यात येते. मात्र सेवा काही सुरू होत नाही. स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करतात म्हणून काही जागरूक माजी सैनिकांनी थेट केंद्र सरकारच्या मंत्रालय स्तरावर संपर्क साधला आहे. तरीही सेवेत बदल झालेला नाही. देशाने गतवर्षीच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. मात्र सध्याच्या आधुनिक काळातही काळाची गरज असलेली दूरध्वनी यंत्रणा ग्रामीण भागात सक्षम झाली नसल्याचे दिसून येत आहे.