- रत्नागिरी, ()- सहायक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय मुलांचे वसतीगृह, कुवारबाव येथे संविधान दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार हे कार्यक्रमाचे पाहुणे आहेत. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.