मविआचे : उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ
देवरुख
- ▪️देश जातीय शक्तीच्या माध्यमातून चालणार नाही तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालतो. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रशांत यादव यांच्यासारख्या दिलदार आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी निवडून देणे गरजेचे आहे. आता तुतारी ताकदीने घराघरात पोहचवून महा विकास आघाडीचे स्वाभिमानी सरकार आणूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांनी केले
▪️महाविकास आघाडीच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ देवरूख येथे करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बने बोलत होते.
▪️शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा. बेरोजगारी हटवून तरूणांच्या हाताला काम मिळावे आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यावे यासाठी हेवेदावे नकरता विरोधकांच्या कुठल्याही मोहाला बळी न पडता चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार प्रशांत यादव यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन बारक्याशेठ बने यांनी केले
▪️यावेळी तालुकाध्यक्ष बाबा साळवी, मोहन वनकर, निलेश भुवड.. व्यापारी संघटनेचे बाबा सावंत,कुणबी समाजाचे युवा नेते पपू नाखरेकर, बापु डोंगरे आदी उपस्थित होते.