चिपळूण – चिपळूण तहसीलदार कार्यालय मार्फत केंद्र सरकारच्या सूचनानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला. राज्यशासनाने हा सप्ताह १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह केला होता यादरम्यान गुड गव्हर्नन्स म्हणून पाळण्यात आला
त्यानुसार चिपळूण तहसिलदार कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणा-या विविध प्रकारच्या सेवा ज्यामध्ये प्रतिज्ञापत्र-260, उत्पन्न दाखले- 76. वय अधिवास दाखले-22, रहिवासी दाखले-12, डॉगरी दाखले-4, ईडब्ल्यूएस दाखले 2 शेतकरी दाखले-1. अल्पभूधारक दाखले 3, नवीन शिधापत्रिका वाटप-124, रेशनकार्डमधील नाव कमी करणे-102, 18+ आधारकार्ड मान्यता दिलेले -6, सातबारा वाटप-637, फेर फार वाटप 149, आठ-अ-184, फेरफार नोंदी निकाली-27 अशा एकूण 1371 तहसिल कार्यालय, चिपळूण मार्फत सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.
- सदर प्रशिक्षणासाठी १२२ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण व तहसिल कार्यालय, चिपळूण या कार्यालयाचे आस्थापनेवरील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना शडॉ. संजय कुंडेटकर, सेवा निवृत उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत महसूल विषयक बाबीचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी १२२ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.