जिल्ह्याकरिता मे. रिअल मेझॉन इंडिया लि. एजन्सी
https://hsrpmhzone2.in वरुन एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी
-सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर
रत्नागिरी, : वाहन क्रमांकमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याकरिता मे. रिअल मेझॉन इंडिया लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. https://hsrpmhzone2.in पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. सर्व वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करुन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याकरिता रिअल मेझॉन इंडिया लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकिंग पोर्टल https://hsrpmhzone2.in वर सोयीप्रमाणे वाहनधारंकांनी अपाॕईंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी. या एजन्सीचे फिटमेंट केंद्र वैभव वसाहत, अरविंद हॉटेलसमोर, लांजा , कंचन हॉटेल जवळ, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी, निर्मल चेंबर खेर्डी रेल्वे ब्रिजजवळ, चिपळूण आणि एच.एन.नं.1190, खेड भरणे रोड, खेड या ठिकाणी कार्यान्वित आहेत.
रत्नागिरी कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामांनिमित्त रत्नागिरीमध्ये वाहन वापरत असेल तरी देखील एचएसआरपी नंबर बसविणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता जीएसटी वगळून पुढीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. दुचाकी/ट्रॅक्टर – 450 रुपये, तीनचाकी – 500 रुपये आणि इतर सर्व वाहनांना 745 रुपये.
भविष्यात या कार्यालयातील कामकाजाकरिता उदा. वाहनांची मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे अथवा उतरविणे, विमा अद्यावत करणे आदीसाठी एचएसआरपी नंबर बसविणे अनिवार्य केले जाऊ शकते, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
000