रायगड
उरण परिसरात उलवे येथे जावळे गावात इंधन साठ्याचा स्फोट झाल्याची घटना रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमाराला घडली आहे. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
घरामध्ये इंधन साठा केला होता त्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सिडकोचे फायर ऑफिसर प्रतीक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी फायर ब्रिगेडची यंत्रणा कार्यरत आहे.