चिपळूण :-शहरानजिकच्या कळंबस्ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा नारळ चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फुटला. यावेळी या गावातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत गावोगावी होत असलेल्या प्रचार सभा, प्रचार फेरीना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचार केला जात असून यावेळी मतदारांना यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराच्या रिंगणात सासूबाई चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण उतरल्या असून जावई यादव यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
तर नुकतेच कळंबस्ते येथे यादव यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार पत्रके देऊन यादव यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.