चिपळूण - जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून दिनांक १४ नोव्हेंबर रोजी माधवबाग क्लिनिक चिपळूण, निमा डॉक्टर्स असोसिएशन , चिपळूण, रोटरी क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह कायमस्वरूपी रिव्हर्सल करणाऱ्या मधुमेह योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे
माधवबागचे संशोधन, संतुलित आहार व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त पंचकर्म थेरपीने आता मधुमेह पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.
मधुमेह मुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदरचा कार्यक्रम सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण येथे पार पडणार आहे.
आजवर मधुमेह कधीही रिव्हर्स न होणारा आजार मानला जात होता. माधवबागचे संशोधन, संतुलित आहार व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त पंचकर्म थेरपीने आता मधुमेह पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.
या डायबिटीस रिव्हर्सल प्रक्रियेमध्ये आहार नियोजन आणि व्यायामाचे नियमितता इत्यादी सारख्या जीवनशैली बदलांच्या बाबतीत रुग्णाच्या समर्पित प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग असतो. रुग्णांच्या प्रयत्नांचा हा विजय साजरा करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी संपूर्ण भारतभर माधवबाग क्लिनिक द्वारे मधुमेह विजयोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जातो.
जगातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के रुग्ण भारतात असून भारत मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेह ह्रदयरोग किडनी विकार नेत्रविकार सांधेदुखी यासारख्या विविध आजारांचे प्रमुख कारण असून मधुमेह ही एक राष्ट्रीय समस्या आहे.
मधुमेह मुक्त भारत हे ध्येय बाळगलेल्या माधवबागच्या या कार्यक्रमानिमित्ताने निमा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चैतन्य खोत, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री जगदीश वाघुळदे, आणि रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष श्री अविनाश उर्फ श्याम पालशेतकर यांनी या कार्यक्रमामुळे अनेक मधुमेही रुग्ण मधुमेहयोद्धांचा आदर्श घेत मधुमेह मुक्त होतील असा विश्वास व्यक्त करत या मधुमेह विजयोत्सवाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.
Live KOKAN EXPRESS