छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा
- चिपळूण – मराठा क्रांती प्रतिष्ठान चिपळूण तालुका या नोंदणीकृती संस्थेने चिपळूणचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांना सविस्तर निवेदन दिले. या निवेदनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भातल्या काही गोष्टींबाबत पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
मराठा क्रांती प्रतिष्ठान चिपळूण तालुका या संस्थेने मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाची पूर्तता व्हावी. तसेच स्टोन क्लाइंडिंगवॉल वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित क्षणचित्रांचे काम अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचेही निदर्शनास आणून दिले.तसेच तसेच तात्पुरते लावलेले पेपर ही आता निघण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी माहिती दिली की, सदरचे काम हे जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु या कामाला जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी काही अवधी मागून घेतला आहे. परंतु हे काम करण्यासाठी किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. आपले यावर लक्ष असून ते लवकरात लवकर करून घेऊ अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराजांच्या पुतळ्यावरची प्रकाश योजना आहे ती कमी पडत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली त्यावर आपण प्रकाश योजनेबाबत आणखी विशेष काय करता येईल यावर विचार करू असेही भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून इन्व्हर्टर अथवा जनरेटरची सोय नाही ती करण्यात यावी असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पाठीमागे स्टोन क्लाइडिंग वॉलवर ‘श्रीमंत ‘ हा शब्द लिहिण्यात आला आहे तो काढून टाकावा अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनीच ही पदवी इतरांना दिली आहे, त्यांनाच ही पदवी आपण कशी देऊ शकतो ? अशीही चर्चा यावेळी झाली यावर आपण लवकरच निर्णय घेऊ असे श्री. भोसले यांनी सांगितले. यावेळी इतरही विकास कामावर मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व ही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या पुतळ्याचे काम पदभार स्वीकारल्यानंतर त्वरित करून अनेक वर्षांची चिपळूणकरांची मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. या बैठकीला मराठा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष सतीश कदम,सचिव राजेश कदम, तसेच कार्यकारणी सदस्य प्रदीप साळुंखे,विक्रम सावंत, रमेश शिंदे दीपक जाधव,सुनील चव्हाण,प्रमोद कदम,अजय चव्हाण, अमित कदम, सौ.निर्मला जाधव,सौ.भाग्यश्री चोरगे