- रत्नागिरी, – जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना व क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, १४ जानेवारी २०२१ अनुसूची २ नुसार पुढील आजाराचा रुग्ण आढळून आल्यास/दाखल आल्यास त्याची परिपूर्ण माहिती कळविणे आवश्यक आहे. अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
- स्थानिक पर्यवेक्षकीय अधिका-यांना अवगत करावयाच्या आजारांची/प्रकरणांची यादी- कॉलेरा (पटकी), प्लेग, घटसर्प, नवजात बालकांचा धनुर्वात, अॅक्युट प्लॅसीड पॅरालेसीस, जॅपनीस इप्सेफलायटिस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ (इनफेक्टिव्ह हिपॅटिटीस), गॅस्ट्रएंटरायटीस, एच. आय. व्ही तपासणी रुग्ण संख्या, नकारात्मक रुग्णांची संख्या व सर्वसाधारण गरोदर माता मासिक तपासणी संख्या (एचआयव्ही), लेप्टोस्पायरोसीस, क्षयरोग (टीबी), गोवर, मलेरिया, चिकन गुनिया, गर्भाच्या लिंगासह एकूण गर्भपाताची संख्या (१६ ते २० आठवडयातील वैद्यकीय गर्भपात असल्यास), स्वाईन फ्ल्यू (एच १ एन १ इन्फूएंझा) शासन अधिसूचित करेल असे आजार.
- अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात पुढील दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. प्रवेश शुल्क, प्रतिदिनी आंतररुग्ण दर (खाटा/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रतिभेट), सहाय्यक वैद्य शुल्क (प्रतिभेट), ५ भूल शुल्क (प्रतिभेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहाय्यक शुल्क, भूल सहाय्यक शुल्क (प्रतिभेट), शुश्रूषा शुल्क (प्रति दिन ), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टीपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडियोलॉजी व सोनोग्राफी शुल्क.
- उपरोक्त प्रमाणे अनुसूची माहिती सादर न करणा-या खासगी व्यसायिकांवर साथरोग अधिनियम १८९७ नुसार व अनुसूची २ नुसार शुश्रुषागृहात दरपत्रक प्रदर्शित न करणा-या खासगी वैद्यकीय व्यसायिकांवर महाराष्ट्र शुश्रुषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यांनी कळविले आहे.