चिपळूण (प्रतिनिधी):- चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या नायरी ग्रामपंचायतच्या सदस्या श्रीमती नसीरा अब्दुल रहिमान काझी यांनी सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेल विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांच्या पुढाकाराने आपला अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना पाठिंबा दर्शवला आहे. याबद्दल वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले
संगमेश्वर तालुक्यातील नायरी ग्रामपंचायतच्या सदस्या श्रीमती नसीरा अब्दुल रहमान काझी यांनी अर्ज भरण्याच्या कालखंडात चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नसिरा काझी या गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असून महिला संघटनांसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. दरम्यान, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त करताना महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून विशेष म्हणजे ते रोजगार निर्मितीसाठी झटत आहेत. यामुळे दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला आपण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक सेल विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अब्बास जबले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी चिपळूण शहराध्यक्षा डॉ. रेहमत जबले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दत्ताराम लिंगायत, ऍड. सरताज कापडी, दिनेश शिंदे, फैसल पिलपिले तसेच नायरी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.