RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

खचलो नाही,पुन्हा लढणार आणि जिंकणार;प्रशांत यादव

९० हजार लोकांच्या हृदयात मला स्थान


चिपळूण:(वार्ताहर)- हरलो म्हणून काय झाले,….खचलेलो नाही,….तुम्हीही खचू नका…..,९० हजार लोकांच्या हृदयात मला स्थान मिळाले,हीच तुमची आणि माझी कमाई आहे,….माझ्यासाठी ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली,….संघर्ष केला त्यांना एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही,…..वाटेल ते करीन पण तुम्हाला अंतर देणार नाही,विचारांची लढाई जबरदस्त आशा ताकदीने आपण लढलेली आहे.त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय,…..तुम्हीही कामाला लागा,पुन्हा लढणार आणि जिंकणार आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांनी आज थेट एल्गार पुकारला.

कुठे काय चुकले,कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू,पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचे रान केलेत आणि अभूतपूर्व असा लढा दिलात त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब तुमचे आयुष्यभर ऋणी राहू,तुम्ही जे प्रेम आणि जिवाभावाचे नाते निर्माण केलंत त्यातून आम्हाला उत्तराई होता येणार नाही.
  • विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा अवघ्या ६१७० मतांनी पराभव झाला.त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.देवरुख येथे मतदार आभार मेळावा घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी चिपळूण शहरातील अतिथी सभागृहात आभार मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता.प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला पदाधिकारी उपस्थित होते.
  • तर यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश कदम,प्रशांत यादव,काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा,शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर,माजी सभापती बळीराम शिंदे,सौ.स्वप्ना यादव,शहराध्यक्ष रतन पवार,शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी,माजी पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे,माजी नगरसेवक राजू देवळेकर ,सतीश खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत कुठे नेमकी चूक झाली,किंवा कुठे आपण कमी पडलो या बाबत विवेचन केले.
  • प्रशांत यादव यांनी मात्र आज अत्यंत तडाखेबंद भाषण केले.ते म्हणाले अवघ्या काही दिवसात या मतदारसंघात आपण जो झंझावात निर्माण केलात त्याला तोड नाही.लढाई मोठी होती,अनेक अडचणी होत्या.त्यात मी नवखा होतो.समोर सत्ता,संपत्ती आणि हजारो कोटींची कामांचा दावा,त्यामुळे सत्ता संपत्ती विरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती.पण तुम्ही अशी काही झुंज दिलीत की समोरच्याला घाम फोडलात,महाराष्ट्रात सर्वत्र निकालांची चर्चा होत आहे.परंतु चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील लढाईची चर्चा देखील महाराष्ट्रात होत आहे.हेच तुमच्या कामाची पोच पावती आहे.असेही प्रशांत यादव म्हणाले.
  • कुठे काय चुकले,कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू,पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचे रान केलेत आणि अभूतपूर्व असा लढा दिलात त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब तुमचे आयुष्यभर ऋणी राहू,तुम्ही जे प्रेम आणि जिवाभावाचे नाते निर्माण केलंत त्यातून आम्हाला उत्तराई होता येणार नाही.मी कोणालाही अंतर देणार नाही.महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय मी घेतला आहे.तुमच्यासाठी वाट्टेल ते करीन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.आशा शब्दात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जबरदस्त असा धीर दिला.
  • मी शांत संयमी जरूर आहे.पण एकदा का माझ्या टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय स्वस्थ ही बसत नाही.आणि तुमची इतकी मोठी ताकद माझ्या पाठी असताना मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही.मी मैदानात उतलोय,आता पुढची लढाई सुरू झाली आहे.पुढे जिल्हापरिषद,पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत.त्यासाठी आज पासूनच कामाला लागा.वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल,पण येथे आपण एकत्र येऊन लढायचे आहे.मी तुमच्या पाठी ठाम उभा आहे.अजिबात काळजी करू नका.आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत.नियतीने कदाचित मोठा विजय आपल्यासाठी ठेवला आहे.त्यासाठी आपल्याला लढायचे आहे.असेही ते म्हणाले.
  • आगामी काळात काहीजण सत्तेच्या दिशेने जाण्याची श्यक्यता आहे.याची कल्पना मला पूर्वीच आली होती.पण तुमच्या सारखे कडवट कार्यकर्ते माझ्या बरोबर होते.आणि जो पर्यंत तळागाळातील कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे.तो पर्यंत मी अजिबात कोणाची चिंता करत नाही.त्यामुळे जे जाणार असतील त्यांना जाऊद्या,आपल्यातले जे सूर्याजी पिसाळ असतील त्यांना बाजूला करून आपण भक्कमपणे एकत्र राहूया,आणि या मतदारसंघात इतिहास घडवूया आशा शब्दात प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांना धीर देत कामाला लागण्याची विनंती केली.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

Must Read

©2024 Live Kokan Express All Right Reserved.