- संगमेश्वर..
- ▪️हार जीत ही माझ्यासाठी महत्वाची नसुन महाविकास आघाडीचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याची निवडणूकीच्या माध्यमातुन मिळालेली माझ्यासाठी एक सुवर्ण संधी असल्याचे स्पष्ट मत आज राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि मवीआचे संगमेश्वर चिपळूण विधानसभेचे राष्ट्रवादी गटाचे उमेदवार प्रशांत यादवं हे संगमेश्वर येथे आले असता त्यांनी येथील पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमुराद गप्पा मारल्या, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला देखील दिलखुलास पणे मन मोकळे गप्पा मारल्या.
- ▪️यावेळी पत्रकारांनी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काही दिवसा पूर्वी पत्रकार परिषेध घेत आपण त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला होता या विषयी आपण काय सांगाल असा प्रश्न विचारला असता श्री, यादव यांनी या प्रश्ना वर भाष्य करताना म्हणाले की, माझी उमेदवारी पक्षाने जाहिर केलेली न्हवती, मा. शरदचंद्र पवार किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोपर्यंत चर्चा होत नाही आणि अधिकृत उमेदवार म्हणुन माझ्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत मी माझी उमेदवारी जाहिर कशी करणार आणि जर उमेदवार म्हणुन माझे नाव जाहिर झालेले नाही तो पर्यंत मी मविआघडीच्या नेत्यांना कसे भेटणार असा प्रतिप्रश्न करीत ! आता रीतसर माझी उमेदवारी आघाडीने जाहिर केली आहे. त्यामुळे आता मी आघाडीतील नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहे.
- ▪️आता आमच्यात कोणताही समज गैरसमज नसुन 24 तारखेला मी माझा निवडणून अर्ज दाखल केला तेव्हा आघाडीतील सर्व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते असे सांगितले. तरीही कोणी नाराज असेल तर मी व्यक्तिशा त्यांना भेटून ती नाराजी दुर करेन असे आवर्जून सांगितले.
- ▪️याच वेळी हेही यादवं यांनी स्पष्ट केले की मला राजकारणातील जास्त कळत असा भाग नाही, मी राजकारणात येत आहे हे कोणावर टीका टिप्पनी करण्यासाठी वा यातून मला काही स्वार्थ साधायचा आहे, कामे मिळवायची आहेत हा हेतू नसुन सध्या महाराष्ट्रात जी काही गद्दारी, फोडाफोडी सारख्या घटना घडत आहेत त्याला जनता कंटाळली आहे. विकास सोडून बाकी सर्व सुरु आहे.
- ▪️हे सारे येथील जनतेच्या कानावर घालुन मतदाराला समजावून सांगण्याची जबाबदारी मविआचे प्रमुख नेते राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा मा, शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, त्यांनी आणि मवीआ च्या नेत्यांनी टाकलेल्या विश्वास यामुळे मला ही सुवर्ण संधी मिळाली आहे.
- या विश्वासाला न्याय देण्याचा मी पुर्ण प्रयत्न करेण हार जीत ही माझ्यासाठी महत्वाची नसुन या निवडणूकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांन पर्यंत आघाडीचा अजेंडा पोचवणे माझे काम असुन ते मी प्रामाणिक पणे करणार आहे, सर्व सामान्य मतदारसोबत सुशिक्षित मतदार आम्हा सोबत आहे. असे स्पष्ट मत चिपळूण संगमेश्वर मतदार संघांचे आघाडीचे उमेदवार श्री, प्रशांत यादव यांनी व्यक्त केले..*