RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

लघू उद्योजकांकरिता जिल्हा पुरस्कार15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळ, द्वितीय पुरस्कार १० हजार रुपये रोख, गौरव चिन्ह



रत्नागिरी, :- जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत लघू उद्योग घटकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच उत्पादनाचा दर्जा उंचाविण्यासाठी व लघू उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी पात्र लघू उद्योगांना जिल्हा पुरस्कार देण्याची योजना राबविण्यात येते. याकरिता विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे 15 मार्च पूर्वी जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) इमारत, जे. के. फाईल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी या कार्यालयास सादर करावेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी लघू उद्याजकांकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी लघू उद्योगांची नोंदणी प्रमाणपत्र / उद्यम प्रमाणपत्र, कमीत कमी मागील दोन वर्षापासून उत्पादन सतत सुरु असावे. वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसावे. यापूर्वी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा.
पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षात दोन पात्र उद्योग घटकांना देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळ, द्वितीय पुरस्कार १० हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळ असे आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, अ.अ. आजगेकर यांनी केले आहे.


admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.