RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

माधवबाग क्लिनिक चिपळूण, निमा, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह मुक्ती सोहळा संपन्न

  • चिपळूण – दिनांक 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून माधवबाग क्लीनिक चिपळूण, निमा, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह कायमस्वरूपी रिवर्सल करणाऱ्या मधुमेहयोद्धांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे पार पडला.
  • ‌. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवबाग क्लिनिकचे डॉक्टर माधव सोमण यांनी केले. यानंतर माधवबाग द्वारा आहार, व्यायाम व शास्त्रोक्त पंचकर्म यांच्या आधारे तयार केलेल्या डायबेटीस रिवर्सल प्रोग्रॅम बद्दल माहिती दिली.
  • माधवबाग क्लिनिक चिपळूणच्या क्लिनिक हेड डॉक्टर राधा मोरे मॅडम यांनी मधुमेह योग्य मधील रुग्णांनी उपचार पद्धतीला दिलेल्या प्रतिसाद ,त्यांची पूर्वी आणि आज असलेली प्रकृती याबद्दल माहिती देत सर्व मधुमेही योद्धांचे कौतुक केले. यावेळी उपचाराप्रती सार्थपणे समर्पण व प्रयत्न करणाऱ्या मधुमेह योद्धांनी ,” माधवबागमुळे आमच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. एका परीने जीवनदान च मिळाले.अशा हृद्य आशयाचे प्रतिपादन केले. माधवबागच्या आहार ,व्यायाम, पंचकर्म या त्रिसूत्रीमुळे मधुमेह पूर्ण पणे रिव्हर्स कसा झाला हा प्रवासही त्यांनी उलगडला. मधुमेह यशस्वीपणे रिवर्सल करणाऱ्या या निश्चयी रुग्णांना ‘मधुमेहयोद्धा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • याप्रसंगी बोलताना निमा डॉक्टर असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर चैतन्य खोत, रोटरीचे अध्यक्ष श्री श्याम पालशेतकर सर, लायन्स चे अध्यक्ष श्री जगदीश वाघुळदे या मान्यवरांनी सर्व मधुमेह योद्ध्यांना शुभेच्छा देत त्यांचा आदर्श सर्व नागरिकांनी घ्यावा व आपल्या भारत देशाला मधुमेहाचे हब होण्यापासून वाचवावे असे आवाहन केले.
  • या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर यतीन जाधव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर श्रद्धा जाधव, लायनेस क्लबच्या अध्यक्ष तमिज मुल्ला, सौ. सीमाताई चाळके, सौ मयुरी काटकर मॅडम, सौ दीपिका आगवेकर, लायन्स क्लब चिपळूणचे सेक्रेटरी श्री राजीव कांबळे, श्री चंद्रकांत कुलकर्णी सर, श्री अजय भालेकर, श्री बापू गांधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सखी थरवळ यांनी अतिशय रंजकतेने केले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

Must Read

©2024 Live Kokan Express All Right Reserved.