माफक व्याजदरात कर्जपुरवठा
चिपळूण – शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था कडून शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. केवळ बारा टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा उपलब्ध करून .देण्यात येत असल्याची माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्न प्रशांत यादव यांनी दिली
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाषराव चव्हाण यांनी वेळोवेळी संस्थेच्या बैठकीत तसेच संस्थेच्या शेतकऱ्यांसाठी आयोजित मेळाव्यांमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांच्या शेती उद्योग विकासासाठी नेहमीच पाठीशी ठामपणे उभे राहील याची ग्वाही दिली आहे. शेतकऱ्यांना शेती तसेच पूरक उद्योगांसाठी या अगोदरही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने त्वरित कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. संस्थेच्या मुख्य धोरणांमध्ये कोकणातील शेतकऱ्यांना पर्यटनपूरक उद्योगांसाठ ज्यामध्ये ऍग्रो टुरिझम सारख्या उद्योगांचा समावेश आहे. याकरिताही संस्थेने कर्जपुरवठा उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना माफक व्याज दरात हा कर्जपुरवठा देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना प्रशांत यादव यांनी दिली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.