RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध

रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच कोटीचा निधी प्राप्त करून घेतला आहे.

या निधीतून आता १३ इको टॉयलेट बायोडायजेस्टर आणि १३ चेंजिंग रूम बांधण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर,मुरुड,भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी, वेळणेश्वर,या ठिकाणी हे टॉयलेट आणि चेंजिग उभारण्यात येतील. कोकणातील वाढते पर्यटन आणि पर्यटकांची गर्दी या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण कोकण ग्रामीण विकास पर्यटन अंतर्गत हा निधी त्वरित मंजूर केल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक पर्यटन व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.