RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

भारतीय जनता पार्टीच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


रत्नागिरी (प्रतिनिधी):

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी सौ. वर्षा ढेकणे होत्या.

या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि सिंदूर लावलेली शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीतून महिला शक्तीचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चा सशक्तपणे कार्यरत असल्याचे या रॅलीतून दिसून आले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.