RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व त्यांचे सहकारी अनिकेत पटवर्धन यांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

गणरायाच्या कृपेने महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग बळकट व्हावा- वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गणेशाचे दर्शन

  • मुंबई – राज्याचे मुख्यमंत्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी यंदा स्थापन झालेल्या गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे.प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण व त्यांचे सहकारी अनिकेत पटवर्धनजी यांना बाप्पाचे दर्शन घेण्याचा योग आला.

गणरायाचे दर्शन घेताना दोन्ही मान्यवरांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी व प्रगतीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पाच्या कृपेने राज्यात सकारात्मकता आणि विकासाचा मार्ग अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गणरायाच्या चरणी वंदन करीत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी व तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागितला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षा निवासस्थानी झालेली ही गणेशस्थापना सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारी ठरली आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.