RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण तर्फे काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन

रत्नागिरी – पंतप्रधान म नरेंद्र मोदी व त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी शहरात भाजपा महिला मोर्चा तर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा व आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर तसेच जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा तर्फे जिल्हा अध्यक्ष सौ. वर्षा ताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, शहर अध्यक्ष सौ. पल्लवी पाटील मंडळ अध्यक्ष सौ परिणीती सावंत मंडलाध्यक्ष सौ स्नेहा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात भाजपाचे झेंडे घेऊन “काँग्रेसचा निषेध असो”, “मोदीजी पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत” अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. महिलांची मोठी उपस्थिती आणि आक्रमक घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या वेळी जिल्ह्यातील तसेच शहरातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनातून काँग्रेसने केलेल्या या कृत्याचा महिला मोर्चा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नेतृत्व व प्रमुख उपस्थिती

सौ. वर्षा ताई ढेकणे, जिल्हा अध्यक्ष, महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण .सौ. नुपुरा मुळ्ये, जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण.सौ. पल्लवी पाटील, शहर अध्यक्ष, महिला मोर्चा रत्नागिरी

भाजपा महिला मोर्च्याचे हे आंदोलन जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले असून महिला कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सहभाग उल्लेखनीय ठरला.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.