- चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गालगत आज सकाळी मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या शॉपीचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते फीत कापून या शॉपीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशांत यादव यांनी शॉपीचालक प्रवीण आग्रे आणि सौ. सायली प्रवीण आग्रे तसेच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते शुभारंभ
या उद्घाटन समारंभाला वालोपेचे माजी उपसरपंच योगेश सोलकर, ग्रामपंचायत सदस्य पूजा नलावडे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ गोरिवले, प्रकाश नलावडे, राजेंद्र गोरीवले, दीपक कदम, सुनील आग्रे, श्रीधर शिरकर, विजय आग्रे, सोनू तांबिटकर, रविंद्र खळे, अशोक कदम, एकनाथ धाडवे, विनोद हर्चिलकर, महेश कोतलुककर, रविंद्र गोरिवले, रामचंद्र गोरिवले, पांडुरंग आग्रे, रंजना गोरिवले, प्रिया धाडवे, पार्वती आग्रे, प्रभाकर शिरकर, राजश्री गोरिवले, सुनील धामणकर, विनोद वकटे आदी उपस्थित होते.
वालोपेतील या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दर्जेदार उत्पादनांमुळे वाशिष्ठी डेअरीवरील विश्वास वाढत आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना या शॉपीचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.