RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

भाजपा महिला मोर्चातर्फे पोलीस सेवेतील महिलांसाठी आरोग्य शिबिर

रत्नागिरी – भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे तसेच सौ कामना बेग यांचे रत्नागिरीत पोलीस सेवेतील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार… ‘ या अर्थपूर्ण घोषवाक्याखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे प्रभाग क्र. ८, रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे पोलीस सेवेत कार्यरत महिलांसाठी विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये महिलांसाठी दातांची तपासणी, गर्भाशय तपासणी, तसेच कर्करोग मार्गदर्शन अशा विविध मोफत तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
कार्यक्रमास पोलीस सेवेतील अनेक महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि त्यांनी या उपयुक्त शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन
या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक फडके मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे साहेब यांनी शिबिराला भेट दिली
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे,सरचिटणीस नुपुरा मुळ्ये,शहर अध्यक्षा सौ. भक्ती मनोर दळी, ओबीसी शहरअध्यक्षा सोनाली केसरकर सौ. कामना बेग, शहर खजिनदार शोनाली आंबेरकर, सुचिता नाचणकर महिला तालुकाध्यक्ष , अनुश्री आपटे, प्रणाली रायकर, प्रज्ञा टाकळे, अनुष्का शेलार, सिया घाग, राधिका आपटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी पोलिसांकडून भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

पोलीस अधीक्षक बगाटे साहेब तसेच उपअधीक्षक फडके मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांनी सांगितले की, “महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे.”

आयोजक :
*️⃣ सौ. वर्षा परशुराम ढेकणे जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा
*️⃣सौ. कामना बेग (सचिव)भाजपा शहर
*️⃣श्री.प्रशांत घाणेकर बुथ प्रमुख भाजपा
*️⃣श्री अमेय मसुरकर

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.