कोण काय बोलतो ते शांत ऐकतो – रमेश कदम
चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य पातळीवरील नेते आणि माजी आमदार रमेशराव कदम यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली असून तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर रमेश राव कदम यांनी हा पवित्र घेतल्याने शरद पवार यांचा पक्ष राजकीय दृष्ट्या कोकणात अडचणीत आला आहे. सध्या कोकणामध्ये रमेश कदम यांच्या व्यतिरिक्त कोणीही सक्षम नेतृत्व नव्हते त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या पक्षाचे सुकाणू पुढे कोण नेणार असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
माजी आमदार असलेल्या रमेशराव कदम यांनी नुकतीच चिपळूण नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढावली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर काही काळ ते शांत बसले होते व अचानक त्यांनी राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता सध्या मी शांत बसलो आहे पुढील पंधरा दिवसात काय कोण बोलतय आणि चर्चा करते ते ऐकणार आहे अजून मी काहीच ठरवले नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले आहे.आता तरी कोणत्या पक्षात जायचे असं नाही हे काहीच हरवले नाही जे कोण काय बोलेल ते फक्त ऐकण्याचे काम करणार आहे अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर रमेशराव कदम यांचे चिपळूण तालुक्यामध्ये अजूनही राजकीय वर्चस्व टिकून आहे परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजकीय संन्यास घेणार की,शिवसेना अथवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याची चर्चाही तालुक्यामध्ये आता सुरू झाली आहे
र