RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रुग्णांना नगरसेविकास सौ वर्षा परशुराम ढेकणे यांनी रुग्णांचे पालकत्व स्विकारले

रत्नागिरी२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून क्षयरोग विभागात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याबरोबरच रुग्णांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, या उपक्रमादरम्यान सौ. वर्षा ढेकणे यांनी सहा क्षयरोग रुग्णांचे पुढील सहा महिन्यांसाठी पालकत्व स्विकारत त्यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी घेतली.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. कांबळे, मेट्रो मॅडम शिरधनकर, बापट विकास पावसकर तसेच क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी बुत अध्यक्ष बबलू विलनकर उपस्थित होते

यावेळी बोलताना सौ. वर्षा ढेकणे यांनी “टीबी मुक्त भारत” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच “आपला एक मदतीचा हात समाजासाठी खूप उपयोगाचा असतो” हा संदेश देत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.या उपक्रमामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.