RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

रत्नागिरीत भारतीय जनता पार्टीचा ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी चा ४६ वा वर्धापन दिन रत्नागिरी जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण पूजा विधीपूर्वक पार पडली. संध्याकाळी महिला कार्यकर्त्यांनी भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले.

कार्यक्रमादरम्यान ऍड. बाबासाहेब परुळेकर तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या शिल्पाताई पटवर्धन यांनी भारतीय जनता पार्टीचा इतिहास पक्षाची वाटचाल आणि कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे संघटना अधिक मजबूत करावी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क आणि समाजाभिमुख काम यांचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी सरचिटणीस ओमकार फडके महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, अशोक वाडेकर बावा नाचणकर संदीप सुर्वे पदवीधर सेलचे मनोज पाटणकर पदाधिकारी तसेच महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी समारोप करताना उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी पक्षाच्या विचारधारेनुसार कार्य करत संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.