प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला पदाधिकारीलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न ?
चिपळूण – भारतीय जनता पक्षाच्या शहर बैठकीत एका फोटो वरून राजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या समोरच ही सगळी शाब्दिक चकमक घडल्याचे कळते
मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकत्रित फोटो काढला होतो व हा फोटो पक्षाच्याच ग्रुप वर व्हायरल झाला. परंतु एका पदाधिकाऱ्याने सदरच्या फोटो खाली “बरं झालं मी या फोटोत नाही ” असा शेरा मारल्याने हा टोमणा नेमका कोणाला यावरून चर्चा सुरू झाली त्यानंतर आज बैठकीत याबाबत एका महिला पदाधिकाऱ्याने सरळ सरळ विचारणा केली . मात्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी याबाबत काहीच बोलण्यास नकार दिला. सदर महिला पदाधिकाऱ्याने सदस्य नोंदणी मध्ये उत्तम काम केले आहे सुमारे पाचशेच्या वर सदस्य नोंदणी केल्यामुळे त्यांची दखल वर्ष पातळीवर घेतली गेली आहे अशी माहिती समजते. परंतु सदर महिला पदाधिकाऱ्याला गेले काही दिवस टार्गेट करण्यात येत आहे आणि हे टार्गेट पक्षाचेच काही पदाधिकारी करत असल्याचे समजते व व फोटोमध्येही अशा प्रकारे कॉमेंट्स गेल्यामुळे नेमका हा शेरा कोणाला याबाबत विचारणा व खडाजंगी झाल्याची समजते.
भाजपच्या शहर अध्यक्षपदासाठी प्रचंड चढाओढ असून जवळपास १४च्या वर पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे एकूणच हे वातावरण असताना नवीन आलेले कार्यकर्तेही काहीसे भांबावून गेलेले आहेत. मात्र अशा वातावरणात आज फोटो कॉमेंट्स चे प्रकरण चांगलेच गाजले