RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना; 31 मार्चपर्यंत अर्ज करा


रत्नागिरी –महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत तरूणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. युवक युवतींना रोजगाराची संधी आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याकरिता दिनांक 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे. त्याकरीता दरमहा रूपये 5 हजार मिळणार आहेत. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर रूपये 6 हजार एकरक्कमी अनुदान दिले जाईल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था आवार,नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी कार्यालयाशी नितिश मुरकर मो. क्रं. 7972914846 आणि पांडुरंग कानडे मो. क्र. 8421241331 यांच्याशी संपर्क साधावा.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews