RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

नाट्यपरिषद चिपळूण तर्फे श्रीदेव कृष्णेश्वर देवस्थान १५० वर्ष उत्सवी नाटक परंपरेचा सन्मान

चिपळूण:–अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे उत्सवांमध्ये नाट्य प्रयोग सादर करणाऱ्या देवस्थान व नाट्य मंडळांचा सन्मान करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. याच उपक्रमा अंतर्गत श्री देव कृष्णेश्वर देवस्थान पाग चिपळूणचा सन्मान करण्यात आला.

  • महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी होत असलेल्या उत्सवामध्ये श्री देव कृष्णेश्वर नाट्य मंडळ पाग चिपळूण तर्फे महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या लळिता प्रित्यर्थ प्रतिवर्षी नाटक सादर केले जाते. या पुरातन देवस्थान चा ज्ञात इतिहास साधारणपणे 900 वर्षांचा आहे असे देवस्थानातर्फे सांगण्यात आले. यावर्षी मंडळातर्फे दिनांक शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री अकरा वाजता कै .आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच ही नाट्य कलाकृती स्थानिक कलावंतांच्या संचामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सादर करण्यात आली. याचवेळी, नाटक सुरू होण्याआधी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे श्री देव कृष्णेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुमेध करमरकर, सन्माननीय ग्रामस्थ श्री. मधुकरपंत जोशी यांना देवस्थानच्या वतीने मानपत्र प्रदान करून नाट्य परिषदेचे संचालक मंगेश बापट व दिलीप आंब्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या वेळी परिषदेच्या कार्यवाह डॉ. मीनल ओक यांनी सन्मान करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे नाट्य परंपरा तसेच सांस्कृतिक परंपरा वर्षानुवर्ष जतन करण्या साठी आणि स्थानिक कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी मंडळातर्फे जे उपक्रम राबविले जातात यासाठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे मानपत्र देण्यात आले. या मानपत्राचे दिलीप आंब्रे यांनी वाचन केले. सत्काराचे वेळी, ज्या जोशी कुटुंबीयांनी श्रीकृष्णेश्वर देवस्थानला जागा दिले त्या कुटुंबातले मधुकर पंत जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देवस्थान द्वारे वर्षानुवर्षे विविध सण व उत्सव साजरे केले जातात, व उत्सवी नाटके सादर केली जातात याबद्दल समस्त पाग ग्रामस्थांचे ऋण त्यांनी व्यक्त केले व असेच उपक्रम निरंतर चालू ठेवण्याचे आवाहनही ग्रामस्थाना केले. या सन्मान कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेतर्फे संचालिका सौ. अपर्णा नातू, ॲड. विभावरी रजपूत, प्रा.संगीता जोशी, श्री.श्रीकांत फाटक आदी मंडळी उपस्थित होती.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.