लेकीकडून वडिलांचा प्रचार!
चिपळूण (प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांची सुकन्या कु. स्वामिनी प्रचारात उतरली असून वडिलांच्या विजयासाठी मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. कु. स्वामिनी मतदारांना भावनिक साद घालत असल्याने मतदारदेखील भारावून गेले आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आतापर्यंत कुमारी स्वामिनी ही आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ निवडणूक रिंगणात उतरली आहे. पहिल्याच दिवसापासून महाविकास आघाडीचे उमेदवार व वडील प्रशांत यादव यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत प्रचार- फेरी रॅली, सभांमध्ये आपला सक्रिय सहभाग दर्शवत आपण देखील मागे नाहीत, असे दाखवून दिले आहे. आता दिवसेंदिवस प्रचाराचा धुरळा उडत असून प्रचार फेऱ्या देखील वाढल्या आहेत. चिपळूण शहर, खेर्डी व शहर परिसरानजीकच्या गावांत नेते व कार्यकर्त्यांसमवेत सक्रियपणे सहभाग दर्शवत प्रचार पत्रके वाटताना आपले वडील प्रशांत यादव यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. यावेळी मतदार देखील तिची आस्थेने विचारपूस करत तिला आम्ही तुझ्या व वडिलांच्या आम्ही पाठीशी आहोत, असा दिलासादायक शब्द देऊन तिला दिलासा दिला जात असल्याने स्वामिनी मतदारांच्या ग्वाहीने भारावून जात आहे.
स्वामिनीचे लोकांकडून कौतुक
कु. स्वामिनी वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेत असून ती नेहमीच आई-वडिलांची सावली बनून राहत असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आता ती वडिलांच्या प्रचाराच्या रिंगणात उतरली असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.