लिंगायत समाज आधार ग्रुपचा पाठींबा
- देवरुख – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा उद्योजक प्रशांत यादव यांना निवडून आणण्यासाठी लिंगायत समाज आधार ग्रुप तालुका संगमेश्वरच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे सांगत पाठींबा दर्शविण्यात आला.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ पिंजून काढत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांनी लिंगायत समाज आधार ग्रुपशी चर्चा करत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व लागेल तेथे नक्कीच सहकार्य करणार असल्याचा शब्द दिला.लिंगायत समाज आधार ग्रुपच्या बैठकीत प्रशांत यादव यांच्यासारखे शांत व संयमी नेतृत्व निवडून येण्याकरीता लिंगायत समाज आधार ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगत पाठींबा दर्शविला आहे.