RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

डीनर डिप्लोमसी:सुग्रास जेवणाच्या राजकीय वासाची गावभर चर्चा

  • चिपळूण – चिपळूण शहरांमध्ये सध्या एका संभाव्य सुग्रास जेवणाची गावभर चर्चा सुरू आहे. मात्र आवतानं देणाऱ्यांनीच अजून आपला होकार कळवला नसल्यामुळे व अशा प्रकारची जेवणाची ‘ट्रीट ‘ होणार काय याबद्दल अधिकृत दुजोरा मिळाला नाही त्यामुळे राजकीय डिनर डिप्लोमासी होणार की नाही याबद्दल कोणीही ठोस सांगू शकत नाही.

राज्यामध्ये शिवसेना पक्षांमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे.आगामी सर्व निवडणुका या स्वबळावर आणि भविष्यामध्ये विधानसभा सुद्धा स्वबळावर लढवण्याची तयारी आणि संघ पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी बांधला आहे त्यामुळे अन्य विरोधी पक्षातील चांगले नेते आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न होत आहेत. अलीकडेच अजित यशवंतराव यांनी अजित पवार यांच्या पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर,शिवसेनेचे नेते व पालकमंत्री उदय सामंत हे नाराज असल्याची चर्चा आहे मात्र त्यांनीही जोरदार तयारी केली असून काही नेत्यांना आपल्या पक्षात समावेश करण्याचा त्यांनी धडाका लावला आहे. जिल्ह्याबरोबर कोकणाच्या राजकारणात पालकमंत्री उदय सामंत यांची यांची मोठी पकड आहे.तसेच शिवसेना मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे बरोबरच त्यांचे नेतृत्व आता प्रस्थापित झाले आहे. य गेल्या वर्षभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेत्यांनाही त्यांनी समावेश करून घेतला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून आता कोकण पातळीवर व राज्य पातळीवर नेत्यांनाही आमंत्रण करण्याचा प्रयत्न होत आहे. चिपळूणमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांना यामध्ये बऱ्यापैकी यश आलेले आहे.

आता शनिवारी एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे अनेक नेते चिपळुणात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते या निमित्ताने, आखाडीचा मुहूर्त साधून आघाडीच्या मुख्य नेत्यालाच सत्तेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून त्यांना जर आणले गेले तर चिपळूणची नगरपालिका निवडणूक लढवणे अधिक सोपे आणि सहज जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. यासाठी सुग्रास जेवणाचा आस्वाद इच्छा व्यक्त करून त्या निमित्ताने या विषयावर चर्चा होईल अशी खमंग चर्चा संपूर्ण चिपळूणमध्येच होत आहे.पण ही खरोखरच प्रत्यक्षात होणारी गोष्ट आहे की केवळ चर्चाच आहे हे समजू शकत नाही. त्यामुळे ही पॉलिटिकल डिनर डिप्लोमसी खरोखरच प्रत्यक्षात अंमलात येते का हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे असे अनेकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सध्या शिवसेनेतील काही संभाव्य उमेदवारांनी अगोदरच भावी नगराध्यक्ष म्हणून बॅनर लावल्याने, या प्रकरणातील ट्विस्ट आणखी वाढला आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण या विषयावरूनच शिवसेनेमध्ये काही प्रमाणात एकमेकांना राजकीय दृष्ट्या अजमावणे सुरू आहे व त्यातच जर बडा नेता या पक्षात सामील झाला तर काय होऊ शकते याचीही चर्चा चिपळुणात आत सुरू आहे

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.