◾एकूण १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान चिपळूण नागरी पतसंस्थेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
- चिपळूण (ओंकार रेळेकर) – ज्या पद्धतीने चिपळूण नागरी चालवली जाते त्याचा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे असे सांगून सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशी वास्तु सहकार भवनांच्या रूपाने बांधली आहे.संपूर्ण तळ कोकणात सुंदर स्ट्रक्चर असलेले सहकार भवन उभारून चिपळूण नागरी पतसंस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी सहकार दिनानिमित्त चिपळूण नागरी पतसंस्था रक्तदान शिबिर घेऊन समाजात एक कौतुकास्पद उपक्रम करीत आहे भविष्यात पतसंस्थेच्या अशा चांगल्या उपक्रमासाठी शासन स्तरावर आपण स्वतः लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहोत हा तुम्हाला आज मी शब्द देतो असे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
- पालकमंत्री म्हणून मी रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड जिल्ह्यात फिरलो परंतु संपूर्ण तळ कोकणात नवी मुंबई पर्यंत चिपळूण नागरी पतसंस्थेने उभारलेल्या सहकार भवन सारखा अतिशय सुंदर स्ट्रक्चर असलेले सहकार भवन नाही अशा शब्दात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेने उभारलेल्या सहकार भवांचे कौतुक केले.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह निमित्त शनिवारी चिपळूण मध्ये सहकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ना.उदय सामंत यांच्या हस्ते झाले.सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना पालकमंत्री ना.उदय सामंत बोलत होते.दरवर्षी सहकार दिनाच्या निमित्ताने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था रक्तदान शिबिर घेते हे खरोखरच आम्हा सगळ्यांना आदर्श देणारं काम आहे म्हणून मी चव्हाण साहेब ,प्रशातजी,स्वप्नाताई आपल्या सर्वांच मनापासून कौतुक करतो आणि नुसतं कौतुक करत नाही तर या चांगल्या कार्यक्रमांमध्ये शासनाचे जर काही सहकार्य आपणास लागलं तर आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत हा तुम्हाला शब्द देतो असे ना.सामंत म्हणाले. पालकमंत्री ना.डॉ.उदय सामंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन,उद्योजक प्रशांत यादव,माजी आ.सदानंद चव्हाण,संचालिका सौ.स्मिताताई सुभाषराव चव्हाण, सीईओ सौ.स्वप्ना यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे,अँड.नयना पवार,अशोक साबळे, विनोद झगडे, संदीप सावंत, अशोक कदम, सूर्यकांत खेतले,उमेश सकपाळ, रामदास राणे, सोमा गुढेकर, राजेश वाजे, मनोहर मोहिते, सत्यवान म्हामूनकर, राजेंद्र पटवर्धन,डॉ.अभिजीत सावंत आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.सहकार भवन मध्ये आज पहिल्यांदा बैठक आयोजित करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या पद्धतीने चिपळूण नागरी चालवली जाते त्याचा अभिमान जिल्ह्यातील प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असला पाहिजे शेवटी एखादी अडीच हजार कोटीची पतसंस्था ही कशी आदर्शवत पद्धतीने चालवायची असते याचे मूर्तिमंत उदाहरण आज मी बघितलं चव्हाण साहेब राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन नवीन नवीन योजना कशा पतसंस्थेमध्ये चालू आहेत याचा अनुभव देखील आज मला घेता आला परवा मी प्रशांतजींना सांगत होतो मी देखील सहकार क्षेत्रामध्ये यायचा विचार करतोय मला काय सहकार सम्राट,महर्षी वगैरे बनायचं नाही कारण त्याच्यासाठी योगदान देखील असावा लागते ते योगदान चव्हाण साहेबांनी दिले आहे कोकणात सहकार क्षेत्रातील एकमेव सहकार महर्षी म्हणून चव्हाण साहेबच आहेत आज इथं आल्यानंतर चव्हाण साहेब देखील मला सांगत होते प्रशांतजीनी देखील सांगितलं की ज्या वस्तूमध्ये आपण बसलोय त्या वास्तूचा झालेला कायापालट देखील आम्ही बघितला आहे असे पुढे आपल्या भाषणात ना.सामंत म्हणाले. पतसंस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.इंडियन रेडक्रॉस सोसायटी ब्लड सेंटर. रत्नागिरी आणि श्री स्वामी समर्थ ब्लड बँक बीकेएल वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाले रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.